भजनी मालिका
← भजनांकडे परत

लखलखिलें सुतेज माझिया नयनापुढें । चतुर्भुज रुपडें मेघश्याम

lakhalakhilen sutej majhiya nayanapudhen | chaturbhuj rupaden meghashyam

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लखलखिलें सुतेज माझिया नयनापुढें । चतुर्भुज रुपडें मेघश्याम ॥१॥ तेणेंचि वेधिलें हदईचि राहिलें । मागें पुढें ठेले वेष्ठुनियां ॥२॥ हदयाची भीतरीं पाहतां बाहेरी । तेंचि चराचरीं दिसे माये ॥३॥ निळा म्हणे तेणें हरिला देहभाव । सांगता हा नवलाव वाटे येरा ॥४॥