भजनी मालिका

भजने

रीघ नाही कोणा पाहुं आले जना । फिटलें पारणा लोचनाचे ॥१॥ नाचत नारद गाताती गंधर्व । तुंबर हावभाव दाविताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य । असावें आरोग्य चिरकाळ ॥१॥ सख्या पुंडलिका आवडतें स्थळ । असावें चिरकाळ स्वस्ति क्षेम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य असावें आरोग्य चिरकाल ।।१।। सख्या पुंडलिका आवडतें स्थळ | असावेंचिरकाळस्वस्तिक्षेम||२||

रचनाकार: संत जनाबाई

रुक्माई म्हणे परियेसी वो आरजे । सांगेन सकळ जें वर्म तुज ॥१॥ अनाथा माहेर एक चक्रपाणि । बहु दिनालागोनी लोभापर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी । गोर्‍याची कसवटी पांडुरंग ॥१॥ माझियाकारणें कर तोडियेले । सांकडें पडिलें मज त्याचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रुक्मांगदाकारणें एकादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥१॥ अंबऋषीकारणॆं द्वादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रुक्मिणीसी सांगे स्वयें कृष्णनाथ । याचें वस्त्र त्वरित आणुनि द्यावें ॥१॥ आणूनियां ग्रंथीं देई जगन्माता । वस्त्र अलंकार तत्वतां काढुनी ठेवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रुणझुण पायीं वाजताती वाळे । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥१॥ जनक्र याचे घरीं चाळूनियां गेलें । दावीं तीं पा-उलें दयानिधी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रुप देखतांचि लोचनीं । राहिलें तें ध्यानीं मनीं ॥१॥ माझिया जिवाचें जीवन । विठ्ठल नामाचें मोहन ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रुप विक्राळ भयानक । चुंचु वाढिलें अधिकाधिक् । पक्ष पसरोनियां अधोमुख । रक्तवर्ण व्दिनेत्र ॥१॥ क्रोधें झगडतां कृष्ण शरीरीं । येरें पक्ष धरिलें करीं । उपटूनियां सांडी पृथ्वीवरी । आपार वातें उसळलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा