भजनी मालिका

भजने

राहिला पाऊस निघावें बाहेर । सांगे विश्वंभर सक-ळांसी ॥१॥ दीनबंधू तेव्हां ठेवी पर्वतासी । भेटती देवासी सकळीक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राहिला हरि लक्ष्मीसहित घरीं । दैन्य सहपरिवारीं पळोनी गेलें ॥१॥ उठोनी पहाटे गरुडा खोगीर घाली । मृत्तिका वहिली वरी आणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राही रखुमाई ऋद्धिसिद्धि जेथें । पडलें पर्वत पक्वान्नांचे ॥१॥ बैसल्या त्या पंक्ति भोगावती तीरीं । पात्रें टाकी हरि वैष्णवाला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राही रखुमाई सत्यभामा माता । सिकवा वो कांता बहुतां परी ॥१॥ संत सनकादिक साक्ष हे सकळ । येणें माझें बाळ चाळविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राही रखुमाई सत्यभामा माता सिकवा वो कांता बहुतां परी।।१।। संत सनकादिक साक्ष हे सकळ । येणें माझें बाळ चाळविलें ॥२॥

रचनाकार: संत गोणाई

राहूं नका येथें जावें समुद्रासी । सांगे हर्षाकेशी सक-ळिकां ॥१॥ तुझिया मस्तकीं असे माझा चरण । न भक्षी तुज जाण पक्षीराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राहेन आतां तुमच्या संगें । हेंचि मागें भक्तांसी ॥१॥ हेंचि दया आतां उदारपणें । माझें करणें रुप नांव ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

राहो ध्यानीं मनीं हेंचि नित्य रुपडें । जे कां वाडेंकोडे आलें पुंडलिका भेटी ॥१॥ ठेवूनियां विटे दोन्ही चरण सुकुमार । विराजले कर सुंदर कटिप्रदेशीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥ लोडे बालिस्तें पलंग सुपत्ती । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम