भजनी मालिका
← भजनांकडे परत

लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें

lakshuniyan yogi pahati abhas | ten dise amhans drushtipudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आम्हांस दृष्टीपुढें ॥१॥ कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥ व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी । सकळां अंतरीं निर्वीकार ॥२॥ रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुल्या मानसीं शिव ध्याय ॥३॥ अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥४॥ अचेत चेतलें भक्तीाचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका म्हणे ॥५॥