भजनी मालिका
← भजनांकडे परत

लक्ष लागुनि अंतरी । कृष्णा पाहती नरनारी

laksha laguni antari | krushna pahati naranari

लक्ष लागुनि अंतरी । कृष्णा पाहती नरनारी । लावण्यसागरु हरि । परमानंदु ॥१॥ छंदें छंदें वेणु वाजे । त्रिभुवनीं घनु गाजे । उतावेळ मनें माझें । भेटावया ॥ध्रु०॥ ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखतो गोंवळा । श्रुति नेणवे ते लिळा । वेदां सनकादिकां ॥२॥ भूतग्रामीचा परेशु । तापत्रयाचा करी नाशु । आड धरुनि गोपवेषु । वत्सें राखे ॥३॥ रासक्रीडा वृंदावनीं खेळे । इंदुवदन मेळे । उध्दरी यदुकुळें कुळदीपकें ॥४॥ निवृत्ति दासाचा दातारु । बापरखुमादेवीवरु । भक्तां देतो अभयकरु । क्षणक्षणांमाजि ॥५॥