भजनी मालिका
← भजनांकडे परत

लक्ष चौर्‍यांयशीं फिरतां । अवचिता लाभ हातां

laksha chaur‍yanyashin phiratan | avachita labh hatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लक्ष चौर्‍यांयशीं फिरतां । अवचिता लाभ हातां ॥१॥ उत्तम पावला नरदेह । त्याचें सार कांहीं पाहे ॥२॥ नको श्रमूं विषयकामा । कांहीं तरी भजे रामा ॥३॥ मरणजन्मांच्या खेपा । निवारीं निवारीं रे बापा ॥४॥ एका जनार्दनीं गूज सोपें । रामनाम सदा जपे ॥५॥