भजनी मालिका
← भजनांकडे परत

लक्ष लावुनि त्रिपुटी ठाण त्रिभंगी चोखडें

laksha lavuni triputi than tribhangi chokhaden

लक्ष लावुनि त्रिपुटी ठाण त्रिभंगी चोखडें । सगुण सांवळें म्हणोनि प्रीति मना ॥ तें देखतांचि पडे मिठी दृश्यातें निवटी । मना गांठी विरोनि ठेली ॥१॥ जवळिल निधान सांडूनि सिणसील बापा । तरि जन्मांतर न चुकेविजें रया ॥२॥ कल्पना काळीमा वेगळी त्यागी । अहंभावाचा मोडी थारा ॥ आशा दासी करुन नातळे कोठें । नावेक मनकरी स्थिर ॥ सगुणीं धरुनि प्रीती । मना हेचि अवस्था । तरि उणीव नये संसारी रया ॥३॥ मन हे मूर्तिमंत कीं निर्गुण भासत । पाहतां नाहीं भेदर्थ इंद्रियासी ॥ आपलें म्हणोनि एके वृत्ति भजतां । बापरखुमादेविवरुविठ्ठलु ध्यातां ह्रदयीं सुखें रया ॥४॥