भजनी मालिका
← भजनांकडे परत

लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश

lachalachya kama nahin talavala | na kale ongala upadesh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥१॥ वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥ समय न कळे वेडगळ बुद्धि । विजाती ते शुद्धि चांच चाट ॥२॥ तुका म्हणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥३॥