भजनी मालिका
← भजनांकडे परत

लग्नाचा सोहळा यथासांग जाहला । नामा वेगीं आला पंढरीसी

lagnacha sohala yathasang jahala | nama vegin ala pandharisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लग्नाचा सोहळा यथासांग जाहला । नामा वेगीं आला पंढरीसी ॥१॥ देऊनियां सर्व पाहती संपदा । येथें तो आपदा न मिळे आन ॥२॥ एका जनार्दनीं माता आणि पिता । राजाईचा तत्वतां शीण करिती ॥३॥