भजनी मालिका

भजने

ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धिसहित ॥१॥ सिद्धि लावी पिसे कोणतया पुसे । नेणे राजहंसे पाणी कायी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटीं दुःख कैचें ॥१॥ नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरी पवित्र तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥ न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥१॥ भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

औट हात घर जायाचें कोपट । दोन दिवस फुकट भोगा कांरे ॥१॥ कवणाचें घर कवणाचें दारा । भावें नरहरि ओळंगारे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

औट हात घोंगडें दिधलें हरी । पांधरलों नाहीं घणीवरी ॥१॥ माझें घोंगडें कृष्णा गा जतन करीं । नागविलें थोरीं पांचाजणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें ॥१॥ आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । कळवेळ तुटी झाल्या तरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कई ऐसी दशा येईल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥ नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कई देखतां होईन डोळीं । सकळां भूतीं मूर्ती सांवळी । जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥१॥ ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कई मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥१॥ केला पांडूरंगें तुझा अंगीकार । मग होईल धीर माझ्या जीवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम