भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओवाळु आरती पंढरीनाथ देवा सदगुरुनाथा

ovalu arati pandharinath deva sadagurunatha

रचनाकार: संत बोधले · अभंग
ओवाळु आरती पंढरीनाथ देवा सदगुरुनाथा । भावे शरण आलो भक्ती शरण आलो चरणी ठेविला माथा ॥ १ ॥ पाहता तुझे रुप दिसे सर्वा ठायी, देवा सर्वा ठायी । सर्वाहुन वेगळा आम्हा जवळच पाही ॥ २॥ सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी । ही खुण दाविली आम्हा जवळच पाही ॥३॥ संत साधुजन अवघे विश्वरुप देवा विश्वरुप । पाहु गेलो महिमा महिमा तुझे न कळे स्वरुप ॥४॥ पंच प्राणांची उजळोनी आरती देवा उजळोनी आरती । भावे ओवाळिता राही रुक्मिणीचा पती ॥५॥ सत्याची आरती सत्य भावे ओवाळू देवा सत्यभावे ओवाळू । बोधला उभा दास तुझा उभा, आपल्या चरणाजवळी ॥६॥