भजनी मालिका
← भजनांकडे परत

कई देखतां होईन डोळीं । सकळां भूतीं मूर्ती सांवळी । जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं

kai dekhatan hoin dolin | sakalan bhutin murti sanvali | jiva nanv bhumandalin | jalin sthalin kashthin pashanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कई देखतां होईन डोळीं । सकळां भूतीं मूर्ती सांवळी । जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥१॥ ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥ ऐसा कई येईन दैवास । दृष्ठि दृश्य हे नासोनि जाईल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥२॥ कई नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार । अमृत तें पृथ्वीजळ सागर । वाहातील पूर आनंदाचे ॥३॥