भजनी मालिका
← भजनांकडे परत

कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें

kain to divas dekhen dolan | kalyan mangalamangalachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें ॥१॥ आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । कळवेळ तुटी झाल्या तरे ॥ध्रु.॥ सरो हें संचित पदरींचा गोवा । उताविळ देवा मन झालें ॥२॥ पाउलापाउलीं करितां विचार । अनंतविकार चित्ता अंगीं ॥३॥ म्हणउनि भयाभीत होतो जीव । भाकितसें कींव अट्टाहासें ॥४॥ दुःखा च्या उत्तरी आळविले पाय । पाहणे ते काय अजून अंत ॥५॥ तुका म्हणे होईल आइकिलें कानीं । तरि चक्रपाणी धांव घाला॥६ ॥