भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धिसहित

olakhila hari dhanya to sansari | moksha tyache gharin siddhisahit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ओळखिला हरि धन्य तो संसारी । मोक्ष त्याचे घरीं सिद्धिसहित ॥१॥ सिद्धि लावी पिसे कोणतया पुसे । नेणे राजहंसे पाणी कायी ॥२॥ काय तें करावें संदेहीं निर्गुण । ज्ञानाने सगुण ओस केलें ॥३॥ केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें । उपजलें मेले ऐसे किती ॥४॥ एका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरिसंगे ॥५॥