भजनी मालिका
← भजनांकडे परत

औट हात घर जायाचें कोपट । दोन दिवस फुकट भोगा कांरे

aut hat ghar jayachen kopat | don divas phukat bhoga kanre

रचनाकार: संत नामदेव · अभंग
औट हात घर जायाचें कोपट । दोन दिवस फुकट भोगा कांरे ॥१॥ कवणाचें घर कवणाचें दारा । भावें नरहरि ओळंगारे ॥२॥ आडें मोडलें घर झांजर झालें । वारा आला तेणें मोडोनि गेलें ॥३॥ खचला पाया पडली भिंती । नामा ह्मणे घर नलगे चित्तीं ॥४॥