भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटीं दुःख कैचें

olakhila hari santhavila potin | hotan tyachi bhetin duhkh kaichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ओळखिला हरि सांठविला पोटीं । होतां त्याची भेटीं दुःख कैचें ॥१॥ नर अथवा नारी हो कां दुराचारी । मुखीं गातां हरी पवित्र तो ॥२॥ पवित्र तें कुळ धन्य त्याची माय । हरिमुखें गाय नित्य नेंमें ॥३॥ काम क्रोध लोभ जयाचे अंतरीं । नाहीं अधिकारी ऐसा येथें ॥४॥ वैष्णवांचें गुह्मा काढिलें निवडुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥