भजनी मालिका
← भजनांकडे परत

औटपीठ डोंगरी गाय एक वसे

autapith dongari gay ek vase

औटपीठ डोंगरी गाय एक वसे । क्षीर सेवितसे निजयोगी ॥१॥ धाले पूर्णपदीं समान लक्षिती । क्षुधा चाड चित्तीं नाहीं नाहीं ॥२॥ भ्रुवांतरीं लक्ष लाऊनी बैसा ध्यानीं । ऐक्यासी उन्मनी होऊनी रहा ॥३॥ ज्ञानदेव नमितो आदी देवी प्रति । नेत्रीं पाहे ज्योती शुध्दरुप ॥४॥