भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी

os jalya maj bhingulavanen | jivalag nenen maj koni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥१॥ भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा॥ध्रु.॥ अंधकारापुढे न चलवे वाट । लागतील खुंटे कांटे अंगा ॥२॥ एकला निःसंग फांकती मारग । होतों नव्हे लाग चालावया ॥३॥ तुका म्हणे वाट दावूनि सद्गु । राहि हा दुरू पांडुरंग ॥४॥