भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥१॥ चित्ताच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तोचि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवें जीव नेणे पापी सारिखाचि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥१॥ आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां देह दुःख थोर आहे ॥१॥ तैसी हरीभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥ काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी ॥१॥ जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥१॥ भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥१॥ माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठुर पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुम्हीं ॥१॥ काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥ येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥१॥ नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥१॥ संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे ओंडीवरी हांव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम