भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे

je dosh ghadale na phite karitan kanhin | sarate tujhya payin jale taise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥१॥ माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठुर पांडुरंगा ॥ध्रु.॥ यातिहीन नये ऐकों ज्यां वेद । तयां दिलें पद वैकुंठींचें ॥२॥ तुका म्हणे कां रे एकाचा आभार । घेसी माथां भार वाहोनियां ॥३॥