भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे

jen jen jethen pave | ten ten samarpaven seve

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥१॥ सहज पूजा या चि नांवें । गिळत अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥ अवघें भोगितां गोसावी। आदीं आवसानीं जीवी ॥२॥ तुका म्हणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ॥३॥