भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान

jen jyachen jevan | ten chi yachakasi dan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान ॥१॥ आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ध्रु.॥ होतीं धालीं पोटें । मागें उरलीं उच्छिष्टें ॥२॥ तुका म्हणे धांव । पुढें खुंटईल हांव ॥३॥