भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुम्हीं

jeje kanhin maj hoil vasana | tete narayana vhaven tumhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुम्हीं ॥१॥ काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींचे ॥ध्रु.॥ तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥२॥ अवघें पिशुन झालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥३॥ तुका म्हणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥४॥