भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें वहावे संकल्प । तें चि पुण्य तें चि पाप

jen jen vahave sankalpa | ten chi punya ten chi pap

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जें जें वहावे संकल्प । तें चि पुण्य तें चि पाप ॥१॥ कारण तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ध्रु.॥ सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥२॥ तुका म्हणे सार । नांव जीवनाचे सागर ॥३॥