भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी

je gati akhand viththalache git | tyanche payin chitta thevin mi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी ॥१॥ जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥ जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं । त्यांचें पायवणी स्वीकारीन ॥२॥ विठ्ठलासी जिहीं दिला सर्व भाव । त्यांच्या पायीं जीव ठेवीन मी ॥३॥ तुका म्हणे रज होईन चरणींचा । म्हणविती त्यांचा हरीचे दास ॥४॥