भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं

jenen ghade narayanin antaray | hot bap may varjavin tin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥ येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥ प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥२॥ तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥