भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे

jenen nahin kelen apulen svahit | pudhilancha ghat ichchhitase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥१॥ संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे ओंडीवरी हांव ॥ध्रु.॥ बांधलें गांठी तें लागलें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे ॥२॥ तुका म्हणे जया गांवां जाणे जया । पुसोनियां तया वाट चाले ॥३॥