भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ

jivinchen janaven ya nanven avadi | henkad ten odhi amangal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥१॥ चित्ताच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तोचि ॥ध्रु.॥ काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥२॥ तुका म्हणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥३॥