भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनसहित देवा ॥१॥ आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वविशीं आह्मीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥ पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडू एक ॥१॥ संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक म्हणतां माझें कोणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥ माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥ मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नी जैसा ॥१॥ सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥ पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥ लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसार हा तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारच्यातापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥ म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥ हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारसिंधु हा दुस्तर । ल्लुंघवे उल्लंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥ किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवती भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारसोहळे भोगिती सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें ॥१॥ भय चित्तीं धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारा आलिया उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम