भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु

sarvarasin minalen chitta | akhandit anandu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु ॥१॥ गोत पति विश्वंभरीं । जाला हरी सोयरा ॥ध्रु.॥ वोळखी ते एका नांवें । इतरवाव खंडणा ॥२॥ तुका म्हणे नांवें रूपें । दुसरीं पापें हारपलीं ॥३॥