भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारच्यातापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची

sansarachyatapen tapalon mi deva | karitan ya seva kutumbachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसारच्यातापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥ म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥ बहुतां जन्मींचा झालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥२॥ वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥३॥ बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस झालों कासाविस ॥४॥ तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीनानाथा ॥५॥