सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी
santa panchan tarin vachanan sevatin | nirop kan bheti ek tari
सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥ कां नेणें निष्ठुर केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
santa panchan tarin vachanan sevatin | nirop kan bheti ek tari
सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥ कां नेणें निष्ठुर केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥
satadivasancha jari jhala upavasi | tarin kirtanasi takun naye
सातादिवसांचा जरी झाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥ फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥
saten chala kajal ghala tel phani kara | divanadarin baisale parin nachon pher dhara
सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥ या साहेबाचें झालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥
sadavilen eka | saren avaghiyan lokan
सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥१॥ आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥
sadhak jale kali | gurugudichi lamb nali
साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥१॥ पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ॥ध्रु.॥
sadhakachi dasha udas asavi | upadhi nasavi antarbahi
साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥१॥ लोलुप्यता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परिमित ॥ध्रु.॥
sadhan sampitta hen chi majhen dhan | sakal charan vithobache
साधन संपित्त हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥ शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥
sadhanache kashta mothe | bhay vate thor hen
साधनाचे कष्ट मोठे । भय वाटे थोर हें ॥१॥ मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥
sadhananchya kala akar akruti | karan navanitin mathanachen
साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥ पिक्षयासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥
sadhanachya kay koti | kelya ati hoti tya
साधनाच्या काय कोटी । केल्या आटी होती त्या ॥१॥ देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपीं ॥ध्रु.॥
sadhanen amuchin adnyechin dharaken | praman sevaken svamisatta
साधनें आमुचीं आज्ञेचीं धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥१॥ प्रकाशिलें जग आपुल्या प्रकाशें । रवि कर्मरसें अलिप्त त्या ॥ध्रु.॥
sadhanen tari hin cha donhi | jari koni sadhil
साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥ परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥
sadhavaya bhaktikaj | nahin laj ha dharit
साधावया भक्तीकाज । नाहीं लाज हा धरीत ॥१॥ ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु.॥
sadhava to dev sarvasvachesathi | prarabdha tuti kriyaman
साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥ मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥
sadhuni bachanag khati tola tola | anikaten dolan na pahave
साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहावे ॥१॥ साधुनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥
sadhuchya darshana lajasi gavhara | veshyechiya ghara pushpen nesi
साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥
sampadala sandin | mag baliya pade bandin
सांपडला संदीं । मग बळिया पडे बंदीं ॥१॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥
sampadala hatin | tari jali he ninshchiti
सांपडला हातीं । तरी जाली हे निंश्चिती ॥१॥ नाहीं धांवा घेत मन । इंद्रियांचें समाधान ॥ध्रु.॥
sapen jyasi khaven | tenen pranasi mukaven
सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥१॥ काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥ध्रु.॥
samave karan | nahin sosat dharanen
सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥१॥ लादी थींके लाजिरवाणी । हीनकामाईंची घाणी ॥ध्रु.॥