भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी॥१॥ वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग झाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्य गुरूरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥ सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्यकर्म आचरें रे । बापा सत्यकर्म आचरें रे ॥१॥ सत्यकर्म आचरें होईल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्यत्वेंशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥१॥ मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥ येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सदा नामघोष करूं हरीकथा । तेणें सदा चित्ति समाधान ॥१॥ सर्वसुख ल्यालों सर्व अळंकार । आनंदें निर्भर डुल्लतसों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥ आतां नको मज खोटयानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे । भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचा । त्यांसी कैचा संसार ॥१॥ दोष पळाले पळाले। पैल आले हरीदास ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम