भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार हा तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं

sansar ha tihin kela pathamora | nahin dravya dara jaya chittin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसार हा तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥ तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥३॥