भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो

sansarasangen paramartha jode | aisen kay ghade janateno

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥ हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥ ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥२॥ तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥३॥