भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग

sarvasva mukaven tenen harisi jinkaven | artha pran jiven dehatyag

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥ मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥ लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशाधडी ॥२॥ शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥३॥ तुका म्हणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥४॥