भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥१॥ कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धि मग ॥१॥ आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥ करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनंति सांगतों ॥१॥ माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥ साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥ लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥१॥ ऐसे तंव तुम्ही नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तीभावें ॥१॥ पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥ आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गाऱ्हाणें देती कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें।

रचनाकार: संत तुकाराम