भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वस्वाची साटी । तरिच देवासवें गांठी

sarvasvachi sati | tarich devasaven ganthi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वस्वाची साटी । तरिच देवासवें गांठी ॥१॥ नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥ द्यावें तें चिं घ्यावें । म्हणउनि ज्यावे जीवें ॥२॥ तुका म्हणे उरी । मागें नूरवितां बरी ॥३॥