भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनसहित देवा

sarvabhaven alon tuj chi sharan | kayavachamanasahit deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनसहित देवा ॥१॥ आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥ माझिये जीवींचेकांहीं जडभारी । तुजविण वारी कोण दुजे ॥३॥ तुझे आम्ही दास आमुचा तूं ॠणी । चालत दूरूनी आलें मागें ॥३॥ तुका म्हणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देई ॥४॥