भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥ आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाळीला विधी तो आजि फळा आला । ऐसा ह कळला साच भाव ॥१॥ नामाची आवडी लागलीसे चित्ता । पाय आठवितां सुख वाटे ॥ध्रु.॥ धरिल्या देहाचे साधले कारण । पुढील्या खंडन गर्भवास ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पाळोनियां मोठे केले । त्यासी बोले ओळखी ॥१॥ जवळोनि नवजे दुरी ।लाड करी कवतुक ॥ध्रु.॥ खून उभा विटेवर । काटींकर ठेउनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥१॥ आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥ जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा ॥१॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । झालें या चित्तासी समाधान ॥१॥ मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पावलों हा देह कागटाळी न्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥१॥ आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥१॥ सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥ अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येईल कळों ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥१॥ काय ऐसें पाप होतें आम्हांपासीं । बोलती एकासी एक एका ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम