भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥ जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाईच्या पती पांडुरंगा ॥१॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी ॥१॥ बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं धवळारें एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडी अवघियां बाजार एक चि जाला । मिविकलीं आपुल्या पाडीं ॥१॥ गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥ काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परिसाचे अंगें सोनें जाला विळा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥१॥ अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास घेती जन्म ॥१॥ कर्मधर्म त्याचे झाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥

पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥ जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जेजेकार हरी हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

पवित्र होईन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥ आपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम