पाहोनिया अधिकार । तैसें बोलावे उत्तर
pahoniya adhikar | taisen bolave uttar
पाहोनिया अधिकार । तैसें बोलावे उत्तर ॥१॥ काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥ आम्हीं जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
pahoniya adhikar | taisen bolave uttar
पाहोनिया अधिकार । तैसें बोलावे उत्तर ॥१॥ काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥ आम्हीं जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥
pikaliye sende kadupan gelen | taisen amhan kelen pandurangen
पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें ॥१॥ काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥ध्रु.॥
pikavaven dhan | jyachi as kari jan
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥ पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥
pind padavari | dila apuliye karin
पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥१॥ माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥
pind posave hen adhamachen dnyan | vilas mishtanna karuniyan
पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥
pindadan pinden thevilen karun | tilin tilavan mulatrayin
पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं ॥१॥ सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मपण सेवटींच्या ॥ध्रु.॥
pindaposhakachya jalo dnyanagoshti | jhani drushtibheti na ho tyachi
पिंडपोशकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥ नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र झाला ॥ध्रु.॥
pundalikache nikataseve | kaisa dhanve baradi
पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥ आपुलें थोरपण । नारायण विसरला ॥ध्रु.॥
pundalik bhaktaraj | tenen sadhiyelen kaj | vaikunthinchen nij | parabramha anilen
पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥१॥ पांडुरंग बाळमूर्ती । गाईगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥
pudhilachen ichchhi phal | nahin bal ten angin
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥१॥ संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥
pudhiliya sukhen nimb detan bhale | bahut varalen hoy duhkh
पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥ हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥
pudhilanche soyi majhya mana chali | matachi anili nahin buddhi
पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥ केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥
pudhen atan kaincha janma | aisa shram varesa
पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥ सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥
pudhen gele tyancha shodhit marag | chala jaun mag ghet amhi
पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥१॥ वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥ध्रु.॥
pudhen janen labh ghade | ten chi vede nashiti
पुढें जाणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥१॥ येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥
pudhen tari chitta | kay yeil ten atan
पुढें तरी चित्ता । काय येईल तें आतां ॥१॥ मज सांगोनिया धाडीं । वाट पाहातों वराडी ॥ध्रु.॥
pudhen yete devi | tichi jati chalon dyavi | magil jhadavi | jhada man asadi
पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥ एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥
punya ubhen raho atan | santachen yakaranen
पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥१॥ पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥
punya paraupakar pap te parapida | anik nahin joda duja yasi
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥ सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥
punya phalalen bahutan divasan | bhagyaudayacha thasa | jhalo sanmukh to kaisa | santacharan pavalon
पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । झालो सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥१॥ आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदटलें पुढें । परब्रम्ह सावळें ॥ध्रु.॥