भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया

pavavil thaya | pandurang chintiliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥ त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥ पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥२॥ तुका म्हणे तई । सिद्धी वोळगती पायीं ॥३॥