भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे

pashan pratima sonyachya paduka | hen ho hatin eka samarthache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥१॥ अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येईल कळों ॥२॥ तुका म्हणे येथें दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥३॥