भजनी मालिका
← भजनांकडे परत

पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं

pavalen pavalen tujhen amhan sarva | duja nako bhav houn deun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥ जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥ भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥