भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां

palilon posilon janmajanmantarin | vagavilon karin dharoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाळिलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥१॥ आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥ नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥२॥ तुका म्हणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥३॥