भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे

paliyele lale | majhe viththale krupale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥ बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥ सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥२॥ तुका म्हणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण ॥३॥