भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी

pashan dev pashan payari | puja ekavari pay thevi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥१॥ सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले॥ध्रु.॥ उदका भिन्न पालट काई । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥२॥ तुका म्हणे हें भाविकांचें वर्म । येरीं धर्माधर्म विचारावें॥३॥