भजनी मालिका

भजने

संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध झालों ॥१॥ आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसाराचें नाहीं भय । आम्हां करील तो काय । रात्रंदिवस पाय । झालों निर्भय आठवितां ॥१॥ आमुचें हें निजधन । जोडियेले तुमचे चरण । आणि संतांचें पूजन । हेंचि साधन सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

संसाराचें सुख कोण पैं सांगती । होत फजिती लहानथोरां ॥१॥ सर्पें मंडुक धारिला से मुखीं । तेणें पैं शेखीं मक्षिका धरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसाराचे सोये चुकले बापुडे । केशव मागें पुढें सांभाळित ॥१॥ आळीकर नामें खेळे महाद्वारीं । आंतून बाहेरी नवजे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥ हरीभजनें हें धविळलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जालो ।करितां न सरे अधिक वाट पाहीं । तृष्णा देशधडी केलों । भक्तीभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों। मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची । करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संसाराबंधन केलें जेणें शून्य । तयासी अनन्य शरण रिघा ॥१॥ मायबाप सखा विठ्ठल विसांवा । त्याचे पायीं ठेवा सदा मन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारार्चे दु:खसुख ह्मणों नये । पुढें दु:ख पाहे अ-निवार ॥१॥ तया दु:खा नाही अतपार जाणा । काळाची यातना बहुतांपरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारासागरी बुडालिया प्राणी । करी सोडवणी कोण त्याची ॥१॥ अविद्यादि पंच क्लेश हे तरंग । बुडालें सर्वांग प्राणियाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसारीं असतां जीवन्मुक्त आह्मी । विठ्ठल हे नामीं वि-नटलें ॥१॥ काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडणें दाही दिशा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारीं असोनी जीनन्मुक्त भक्त । आलासे धांवत तया भेटी ॥१॥ समाधिसुखें तल्लीन वाचे नारायण । लाविले नयन उन्मळीत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसारी गांजलों म्हणोनि शरण आलों । पाठीसि रिघालों देवराया ॥१॥ कळिकाळा वास पाहूं तूं न देसी । भरंवसा मानसीं आहे मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारीं तरले बोलती ते कुडे । जाती ते बापुडे अधोगती ॥१॥ नेणती आचार विचार स्वधर्म । करताती कर्म मना तैसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संसारीं निधान लाधलें जनां । सद्‌गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥ कायावाचामनें तयास देवात्रीं । वस्तु माणून ध्यावी अगोचर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारी निधान लाधले जनां सद्गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥ कायावाचामनें तयास देवावीं । वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥ २॥

रचनाकार: संत जनाबाई