भजनी मालिका

भजने

सहस्र तोंडांचा तोहि भागियेला । अंत नाहीं ज्याला गुणालागीम ॥१॥ तेथें मी पामर काय बोलूं वाणी । तुझी कीर्ति जनीं काय कैसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहस्रअठयांशींऋषि । स्कंद उपदेशीं तयांसी । तिही एक पुसिली पुसी । ते तयासी अकळ ॥१॥ आतां जाऊं कैलासा । सकळ पुसूं त्या महेशा । मग निघाले आकाशा । पितृदेशा पातले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहस्रदळांत आकाशाच्या परी । राहोनी शरीरीं शोभा दावी ॥१॥ तेंचि नटे थाटे उभा विटेवरी । कर कटावरी ठेऊनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहस्रनामाची घालितां लाखोली । तरला हा कोळी वाल्मिक तो ॥१॥ पुराणप्रसिद्ध गोष्टी ह्या ऐकाव्या । प्रत्यक्ष देखा-व्या कोणे ठायीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहस्रार्जुनाकरीता जाहला परशुराम निक्षत्री धरीत्रीकेली जाण ॥१॥ वलीकरीता झाला वामन अवतार। घातीला हो धूर पाताळांत ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

सहा चार अठरा बारा जे वर्णिती । चौदांची तों गति कुठित गे माय ॥१॥ पांचासी न कळे सात पैं भांडती । आठांची तो गति कुंठित जाली गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सहा ते भागले वेवादती सदा । सहांची आपदा होती जगीं ॥१॥ सहांचे संगती घडतसे कर्म । सहा ते अधर्म कारिताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सह्स्त्र दळांमधुन अनुहातध्वनि उठी । नामाचेनि गजरें पातकें रिघालीं कपाटीं ॥१॥ जागा रे गोपाळांनों रामनामीं जागा । कळिकाल एका नामें महादोष जाति भंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

साकर दिसे परि गोडी न दिसे । तें काय त्यावेगळी असे ॥१॥ तैसा जनीं आहे जनार्दन । तयांचें पहावया सांडीं अभिमान ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साकरेची गोडी साकर सांडुनि उभी घडी । तैसें आयुष्य जोडिलें जोडी नरदेहा ॥१॥ मातियाचें आवदाणें घालिताती अंगीं । भोगावयालागीं विषयसुख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साकरेची गोणी बैलाचिया पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥१॥ मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम